ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांची मंगळवारी भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. जेठमलानी यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी रद्द करण्यात आले आहे. 
संसदेचे अधिवेशन सुरू असताना पक्षाने काढलेला पक्षादेश (व्हीप) न पाळल्याबद्दल जेठमलानी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे पक्षाच्या संसदीय मंडळाने मंगळवारी त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader