खाण भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊ नये यासाठी त्यांच्या नाकदुऱ्या काढण्याचा भाजपचा प्रयत्न रविवारी असफल ठरला. भाजपचा त्याग करून ९ डिसेंबरला स्वतच्या मालकीचा पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयावर येडियुरप्पा ठाम आहेत. येडियुरप्पांनी पक्षत्याग करू नये यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी दिल्लीहून अरुण जेटली शनिवारी रात्री येथे दाखल झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याच्या घरी त्यांची व येडियुरप्पांची बैठक झाली. तीत जेटली यांनी येडियुरप्पांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र,येडियुरप्पा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले असल्याचे समजते.    

Story img Loader