नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एफआयआर आणि सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात त्याच्यावर आरोप निश्चित केले आहेत. हे आरोप मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा : इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

ब्रिजभूषण यांची याचिका न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्यासमोर गुरुवारी सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की तपास पक्षपाती पद्धतीने केला गेला. कारण केवळ पीडितांच्या म्हणण्याचाच विचार केला गेला आहे. ज्यांनी आरोप केले, त्यांना केवळ बदला घेण्यात रस होता आणि असत्य आरोप करण्यात आले. हे आरोप लक्षात न घेता स्थानिक न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले, असे ब्रिजभूषण यांनी याचिकेत म्हटले आहे.