आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षच सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असली, तरी याचा अर्थ त्यांच्या जागांमध्ये फार मोठी वाढ होईल, असा काढता येणार नसल्याचे बॅंक ऑफ अमेरिका मेरिल लिंच यांच्या अहवालात म्हटले आहे.
भाजपचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि इतर पक्षांना स्वतःसोबत घेण्यासाठी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा निश्चितच उपयोग होणार आहे. मात्र, या निवडणुकीचे निकाल आणि २०१४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक यांचा थेट संबंध जोडता येणार नाही, असे बॅंक ऑफ अमेरिका मेरिल लिंच यांनी म्हटले आहे.
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे भाजपच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळेच त्याचा लोकसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दुसऱया बाजूला या निकालांमुळे कॉंग्रेसच्या गोटात निराशेचे वातावरण असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवर होऊ शकतो.

Story img Loader