एक्स्प्रेस वृत्त/रॉयटर्स

नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या देणग्यांच्या कंपन्या आणि राजकीय पक्ष अशी संगत लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्याआधीपासून कार्यरत असलेल्या ‘इलेक्ट्रोरल ट्रस्ट’ अर्थात निवडणूक विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या देणगीपुरवठयातही भाजपच मोठा लाभार्थी पक्ष असल्याचे दिसून येत आहे. नवी दिल्ली स्थित प्रूडंट इलेक्ट्रोरल ट्रस्टकडे गेल्या दहा वर्षांत जमा झालेल्या २२५४ कोटी रुपयांच्या देणग्यांपैकी ७५ टक्के निधी भारतीय जनता पक्षाच्या खात्यात वळता करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
challenges in infrastructure development in india
महाशक्तीचं स्वप्न पाहणाऱ्या देशात एवढी ‘पडझड’ का होतेय?

प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्टच्या स्थापनेपासून दहा वर्षांत काँग्रेसच्या खात्यात १७० कोटींची भर टाकण्यात आली. त्या तुलनेत भाजपला मिळालेल्या देणग्या दहापट अधिक असल्याचे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या तपासणीत आढळले आहे.

‘रॉयटर्स’ने २०१८ ते २०२३ या काळातील विश्वस्त संस्थांकडील देणग्यांचे स्रोत आणि पुरवठा यांच्या नोंदी तपासल्या असता भारतातील आघाडीच्या आठ उद्योगसमूहांनी प्रूडंटकडे जमा केलेले ४१४ कोटी भाजपच्या खात्यात वळते करण्यात आल्याचे आढळून आले. यामध्ये आर्सिलर मित्तल निपॉन स्टील, भारती एअरटेल, जीएमर आणि एस्सार या कंपन्यांचा समावेश असल्याचे आढळून आले.  

निकषाशिवाय वितरण

टाटा समूहाच्या प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातूनही गेल्या दहा वर्षांत जमा करण्यात आलेल्या निधीतील मोठा हिस्सा भाजपच्या झोळीत गेला आहेत. या संस्थेने भाजपला ३.६ अब्ज रुपयांच्या देणग्या पुरवल्या तर काँग्रेसच्या खात्यात ६५ कोटी रुपये जमा केल. मात्र, ‘प्रोग्रेसिव्ह’च्या नियमानुसार लोकसभेतील संख्याबळानुसार देणगीचे वाटप करण्यात आले. ‘प्रूडंट इलेक्ट्रोरल ट्रस्ट’मध्ये मात्र, निधी वितरणाचे असे कोणतेही निकष नसल्याचे ‘रॉयटर्स’च्या पाहणीत आढळून आले.

चटदेणगी, ‘पटवितरण

२०१९ते २०२२ दरम्यान प्रूडंटच्या १८ व्यवहारांमध्ये देणगीचे धनादेश येताच तितकी रक्कम अवघ्या काही दिवसांत भाजपच्या खात्यात जमा झाल्याचे आढळून आले. यामध्ये अब्जाधीश उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या आर्सिलर मित्तल समूहाच्या देणग्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

बीआरएस, राष्ट्रवादीही लाभार्थी

रॉयटर्सच्या पाहणीनुसार मेघा इंजिनीअरिंग या कंपनीने जुलै २०२२ मध्ये प्रूडंटला ७५ कोटींची देणगी दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तेवढयाच रकमेचा धनादेश भारत राष्ट्र समिती पक्षाच्या खात्यात जमा झाला. २७ नोव्हेंबर २०२० रोजी अविनाश भोसले समूहाने प्रूडंटला ५ कोटींची देणगी दिली. त्याच्या तीन दिवसांतच तेवढी रक्कम राष्ट्रवादीच्या खात्यात जमा झाली.