मोदी सध्या जपानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. येथे ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. याआधी त्यांनी जपानमधील टोकियो येथे भारतीय जनसमुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जपान आणि भारत यांच्यातील संबध तसेच भारतीय संस्कृती आणि लोकशाही याबद्दल भाष्य केले. मागील आठ वर्षांपासून भाजपा सरकारने लोकशाहीला अधिक बळकट बनवले आहे. भारतात सध्या खऱ्या अर्थाने जनतेच्या नेतृत्वातील सरकार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> कर्नाटकमध्ये मशिदीत सापडली मंदिरासारखी रचना; खोदकाम सुरु असताना लागला शोध

यावेळी बोलताना “मागील आठ वर्षांमध्ये भाजपा सरकारने लोकशाहीला अधिक मजबूत बनवले आहे. आम्ही एक सर्वसमावेशक तसेच सर्वोत्तम प्रशासन तयार करण्यासाठी प्रयत्नरत आहोत. सध्या भारतात खऱ्या अर्थाने जनतेच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. भारतीय लोकशाही प्रबळ करण्यासाठी हे एक महत्त्वाचे कारण आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> VIDEO: “व्वा! तू हिंदी कुठे शिकलास?”, जपानी मुलाच्या तोंडून हिंदी ऐकताच मोदींकडून विचारणा, म्हणाले…

तसेच पुढे बोलताना, आपण भारत-जपान संबंध आणखी दृढ करण्यासाठी कटीबद्ध आहोत. जपानने भारताच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पडलेली आहे. जपान आणि भारत यांच्यातील संबंध आध्यात्मिक, सहाकार्यपूर्ण आणि आपुलकीचे आहेत. जगाने अराजकता, दहशतवाद, हवामान बदल अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी बुद्धाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे, असेदेखील मोदी म्हणाले

हेही वाचा >>> रशिया-युक्रेन युद्धातील पहिला युद्ध गुन्ह्याचा खटला, ६२ वर्षाच्या नागरिकाला मारल्याबद्दल रशियाच्या सैनिकाला जन्मठेपेची शिक्षा

दरम्यान आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात मोदी क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत सहाभागी होणार आहेत. या परिषदेत भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. या परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जपनानचे पंतप्रधान फुमियो कशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader