मध्य प्रदेशातील सध्याचे भारतीय जनता पक्षाचे सरकार हे कॉंग्रेसच्या सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट असल्याची टीका पक्षाचे माजी नेते के. एन. गोविंदाचार्य यांनी सोमवारी केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार हे दिग्विजयसिंह यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट असल्याचे गोविंदाचार्य यांनी म्हटले आहे.
आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार रोखण्यात मुख्यमंत्री चौहान अपयशी ठरल्याचे मत गोविंदाचार्य यांनी मांडले. गेल्या पाच वर्षांतील राज्यातील भाजपच्या सरकारवर उद्योगपती आणि नोकरदार खूष असले, तरी शेतकऱयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे तो नाराज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader