गुवाहाटी: आसामधील ८० पैकी ७३ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. सायंकाळपर्यंत काँग्रेसला एकाही ठीकाणी बहुमत मिळाले नव्हते. पाच पालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपने ६७२ प्रभागांमध्ये तर काँग्रेसला ७१ ठिकाणी विजय मिळवता आला. इतरांना १४९ प्रभाग जिंकता आले. यापूर्वीच ५७ प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. विकासाच्या बाजूने जनतेने प्रचंड कौल दिला आहे अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हेमंतबिस्व सरमा यांनी दिली आहे. तर राज्याला पक्षाला अधिक मेहनत घ्यावी लागेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बाऊआ यांनी नमूद केले. ८० पालिका मंडळांसाठी ६ मार्च रोजी मतदान झाले होते.