“तेलंगणात सत्तेत आल्यावर मुस्लिमांचे आरक्षण रद्द करून टाकू”, अशी जाहीर घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. यावरून एआयएमआयएमचे प्रमुख अससुद्दीन ओवैसी यांनी अमित शाह आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. रेकॉर्डब्रेक महागाई आणि बेरोजगारी बोला असा खोचक सल्लाही ओवैसी यांनी अमित शाहांना दिला. आज त्यांनी ट्वीटरवर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ओवैसी ओवैसीचं रडगाणं किती दिवस चालणार आहे? फक्त डायलॉग मारत राहता. रेकॉर्डब्रेक महागाई आणि बेरोजगारीवरही कधीतरी बोला. तेलंगणात दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. असे असतानाही येथील मुस्लिम आरक्षण काढून टाकण्याचे अमित शाह म्हणतात”, असं ट्वीट अससु्द्दीन ओवैसी यांनी केलं आहे.

“तेलंगणात मुस्लिमविरोधी वक्तव्य करण्याशिवाय भाजपाकडे कोणतेही व्हिजन नाही. खोट्या चकमकी, हैदराबादमधील सर्जिकल स्ट्राईक्स, संचारबंदी, गुन्हेगारांना सोडणं हेच भाजपाकडून केलं जातं. तुम्ही तेलंगणाच्या लोकांचा इतका तिरस्कार का करता?” असा सवालही त्यांनी यावेळी विचाला आहे.

“जर शाह एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर आहेत, तर त्यांनी ५० टक्के आरक्षणाची कमाल मर्यादा काढण्यासाठी घटनेत बदल केला पाहिजे. मागास मुस्लिमांचं आरक्षण एम्पिरिकल डेटावर अवलंबून आहे. यासाठी सुधीर कमिशनचा अहवाल वाचा. जर तुम्हाला जमत नसेल तर इतर कोणाला तरी सांगा”, असंही अससुद्दीन ओवैसी म्हणाले.