हैदराबादमध्ये भाजपाच्या दोन दिवसीय कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. २ आणि ३ जुलैला आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. १८ भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी होणर आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
हैदराबादमध्ये भाजपाच्या दोन दिवसीय कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. १८ भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी होणर आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत धोरण
या बैठकीत पक्षाचा विस्तार तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत धोरण ठरण्यात येणार आहे. या बैठकीत ओडिशाचे भाजपा अध्यक्ष समीर मोहंती, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते के के शर्मा, तामिळनाडू भाजपा अध्यक्ष अन्नामलाई, गुजरातचे उप मुख्यमंत्री नितीन पटेल सहभागी होणार आहेत.
भाजपाचे ‘मिशन दक्षिण’
जवळजवळ १८ वर्षांनंतर, हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या अगोदर २००४ साली हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. ही बैठक तेलंगणासाठी महत्वाची असल्याचे सांगितले जात आहे. पुढच्या वर्षी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाने आपली कंबर कसली आहे. ‘मिशन दक्षिण’ अजेंड्याखाली भाजपा दक्षिण भागातील अधिकाधिक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
फडणवीस सभेला येणार?
हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सरचिटणीसांच्या बैठकीने होणार आहे. ज्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, ३ आणि ४ जुलैला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात फडणवीस व्यस्त असल्यामुळे त्यांची या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी दिसत आहे.