नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसांमध्ये तर, दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तारखा नोव्हेंबरच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवडय़ामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या दोन्ही आगामी निवडणुकांमुळे भाजप आणि आम आदमी पक्षामधील (आप) संघर्ष तीव्र झाला आहे. ‘आप’चे गैरप्रकार, घोटाळे आणि धोरणांमधील फोलपणा उघड करण्यासाठी भाजप ५० हजार ‘नमो सायबर योद्धय़ां’ची फळी उतरवणार आहे.
‘नमो सायबर योद्धा’ही भाजपची ‘आप’विरोधातील ऑनलाइन प्रचार मोहीम असून दिल्लीतील ‘आप’ सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. महिनाभरामध्ये सुमारे ५० हजार स्वयंसेवक ‘नमो सायबर योद्धां’च्या माध्यमातून ‘आप’ सरकारचा सातत्याने पोलखोल करतील, अशी माहिती भाजपचे प्रवक्ता व दिल्लीच्या समाजमाध्यम प्रचार विभागाचे प्रभारी शहजाद पुनावाला यांनी पत्रकारांना दिली. ‘आप’विरोधात लवकरच ऑनलाइन प्रचार मोहीम सुरू केली जाणार आहे. राजकीय क्षेत्राशी संबंध नसलेले सामान्य नागरिक या प्रचार मोहिमेत ‘आप’विरोधात गाऱ्हाणे मांडू शकतात, असे पुनावाला म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपने दिल्लीतील ‘आप’ सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. उत्पादन शुल्क धोरणामध्ये बदल करून ‘आप’च्या नेत्यांनी आणि मर्जीतील अधिकाऱ्यांनी मद्यविक्रीतून ‘कमिशन’ खिशात टाकले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीही केली जात आहे. प्रचार आणि प्रसारावर ‘आप’ सरकाने पैसे उधळले असून सरकारचा प्रचारावरील खर्च ४२० टक्क्यांनी वाढला आहे. दिल्लीतील ‘आप’ सरकार जागतिक दर्जाच्या शाळा उभारल्या दावा करत असले तरी, १० दर्जेदार महाविद्यालये उभी करता आलेली नाहीत, नवी रुग्णालये बांधता आलेली नाहीत, यमुना नदी प्रदुषणग्रस्त झालेली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये ‘आप’ सरकार सर्व स्तरावर फोल ठरले आहे, अशी टीका पुनावाला यांनी केली.
दिल्लीतील तीन महापालिकांचे विलिनीकरण करून प्रभागांची संख्याही २७२ वरून २५० करण्यात आली आहे. विलिनीकरणानंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होणार असून आत्ता तीनही महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. महापालिकांमधील भाजपच्या कारभारापेक्षा दिल्लीतील ‘आप’ सरकारच्या अपयशाचा मुद्दा ऑनलाइन प्रचार मोहिमेमध्ये प्रामुख्याने ऐरणीवर आणला जाणार आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतही ‘आप’विरोधात प्रचारासाठी सायबर योद्धय़ांचा दुहेरी लाभ मिळू शकतो, असे भाजपचे म्हणणे आहे.