लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि जनता दल युनायटेडमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. बिहारमध्ये दोन्ही पक्ष समान जागा वाटून घेणार आहेत. फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी संयुक्तपणे पत्रकारपरिषद घेत निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा केली.

पुढच्यावर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समान जागा वाटून घेतील. अन्य मित्र पक्षांनाही सन्मानजनक जागा मिळतील असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

कोण कुठल्या जागांवर आणि किती जागांवर लढणार आहे यासंबंधी पुढच्या काही दिवसात घोषणा केली जाईल. उपेंद्र कुशवाह आणि राम विलास पासवान आमच्यासोबतच राहतील असे अमित शहा यांनी सांगितले

Story img Loader