Delhi Vidhan Sabha Election 2020 Result Live Updates : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिछाडीवर असली तरी गेल्या निवडणुकीच्या (२०१५) तुलनेत या पक्षाने मोठी झेप घेतली आहे. यामध्ये केवळ जागांमध्ये झालेली वाढच नव्हे तर त्यांच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांच्या टक्केवारीत देखील वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सन २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ३२ टक्के मतं मिळाली होती. यामध्ये काँग्रेसने सुमारे १० टक्के मतं मिळवली होती तर आम आदमी पार्टीला (आप) सर्वाधिक ५४ टक्के मतं मिळाली होती. या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील ताज्या कलांनुसार, भाजपाला ४३ टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. पहिल्या तीन तासांमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार हा अंदाज बांधण्यात आला आहे.

या वाढत्या मतांच्या वाढीच्या जोरावरच भाजपा सुमारे २० जागांवार आघाडीवर आहे. २०१५ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ ३ जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही काँग्रेसला भोपळाही फोडता येत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी काँग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सलग पंधरा वर्षे सत्ता राखली होती. यंदा काँग्रेसच्या पारड्यात सुमारे ४.५ टक्केच मतं पडली असल्याने गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांचे पाच टक्क्यांचे नुकसान झाले आहे.

खरंतर या निवडणुकीत खरा झटका अरविंद केजरीवाल यांना बसला असून ‘आप’ला २०१५ मध्ये ५४ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ४९ टक्के मतं मिळण्याचे एकूण कलांवरुन कळते. त्या तुलनेत भाजपाची कामगिरी चांगली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान होतील हे निश्चित मानले जात आहे.