राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांची स्पष्टोक्ती
पंतप्रधानपद उमेदवारीसाठी आमची कोणाला पसंती आहे? हे उघडच आहे परंतु, अंतिम निर्णय भारतीय जनता पक्षाचाच(भाजप) असेल असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकींसाठी भाजपच्या वतीने संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. लवकरच भाजप आपला पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार जाहीर करण्याची चिन्हेही आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य म्हणाले, “संघाने आपली भूमिका याआधीच भाजपसमोर स्पष्ट केली आहे. त्याबद्दलची पूर्णकल्पनाही भाजप कार्यकारिणीला देण्यात आली आहे. आता पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार कोण आणि केव्हा जाहीर करायचा हे संपूर्णपणे पक्षावर अवलंबून आहे.”
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठींबा आहे. परंतु, उमेदवार लवकरच जाहीर करावा यासंबंधिचा कोणताही दबाव संघाने भाजपवर ठेवलेला नाही. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा