पीटीआय, नवी दिल्ली
वक्फ कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशव्यापी अभियान राबविले जाईल. २० एप्रिलपासून १५ दिवस चालणाऱ्या या अभियानात विरोधकांचे आरोप खोडून काढले जातील असे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिनिधींपुढे स्पष्ट केले.
विरोधक मुस्लीम समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप नड्डा यांनी केला. वक्फच्या पारदर्शक कारभारासाठी सरकारने यामध्ये पसमंदा मुस्लीम तसेच महिलांना सहभागी करून घेण्याचा निर्धार केल्याचे ते म्हणाले. बैठकीला भाजपशासित राज्यातील वक्फ मंडळाचे सदस्य व अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.