यूपीए सरकारविरूध्द जनमत तयार करण्यासाठी भाजपने आता सोशल मिडियाचा आसरा घोतला असून, सरकारविरूध्द चार्जशीट तयार करण्यासाठी ‘डार्क डिकेड्स ऑफ यूपीएज मालगव्हर्नन्स’ (यूपीएच्या शासनशून्यतेचे अंधकारमय दशक) असे संकेतस्थळ सुरू केले आहे.
नवी दिल्ली येथे भाजपच्या बड्या नेत्यांनी आज (बुधवार) http://www.india272.com या संकेतस्थळाचे अनावरण केले. या संकेतस्थळावर केंद्रातील यूपीए सरकारच्या कारभाराविरोधात विरोधी पक्षांनी तयार केली चार्जशीट वाचता येणार असून, फेसबुक, ट्विटर, फ्लिकर या सोशल नेटवर्कींग साईटसोबतच एसएमएसद्वारेही यूपीएविरूध्द तक्रार नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सरकारविरूध्द तक्रार नोंदवणा-यांना त्यांची ओळख गुप्त ठेवायची असेल तर तशीही सोय ठेवण्यात आली आहे, असे भाजपर्फे सांगण्यात आले आहे.
लोकांच्या सहकार्याने ‘चार्जशीट’ तयार करण्याचा हा नवीन प्रयत्न असून ऑनलाईन सोबतच पक्षाचे नेते आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतील, असं भाजपचे जेष्ठ नेते रवि शंकर प्रसाद म्हणाले,         
भ्रष्टाचार, महागाई, सरकारचा कुचकामीपणा, दहशतवाद आणि माओवाद्यांचा विस्तार, बेरोजगारी आणि शेतक-यांच्या आत्महत्या अशा पध्दतीने समस्यांचं  वर्गीकरण करण्यात आलं असल्याचं रवि शंकर प्रसाद म्हणाले. भाजपची कमिटी सप्टेंबरमध्ये मुंबई, लखनौ, बंगळुरू आणि गुवाहाटीचा दौर करणार असल्याचंही ते पुढे म्हणाले.

Story img Loader