कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटले आहेत. कर्नाटकात काँग्रेसला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. असं असलं तरी पक्षाने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नाही. मुख्यमंत्रीपदावरून कर्नाटकमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये रस्सीखेच असल्याचं बोललं जात आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अनेत बैठका घेतल्या जात आहेत.

काँग्रेसच्या या राजकीय हालचालींवरून भाजपाच्या आयटी सेल विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी टोलेबाजी केली आहे. सर्कस बघायची आहे का? कर्नाटकात काँग्रेसने आपला मुख्यमंत्री निवडला पाहा, असा उपरोधिक टोला मालवीय यांनी लगावला. त्यांनी ट्वीट करत ही टीका केला.

Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Image Of Jagdeep Dhankhar.
Jagdeep Dhankhar : “जग आपल्याकडे पाहत आहे, तरीही आपण…” संसदेतील गदारोळावर राज्यसभेच्या सभापतींची उद्विग्न प्रतिक्रिया
nana patole reaction on amit shah controversial statement about dr babasaheb ambedkar
भाजपचा संविधान निर्मात्यांबद्दलचा राग बाहेर आला… नाना पटोले म्हणाले, “अमित शहा…”
Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा
Shatrughan Sinha slams Mukesh Khanna
“हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”

हेही वाचा- “१६ आमदार अपात्र ठरणार नाहीत”; अजित पवारांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “पोपट…”

मालवीय ट्वीटमध्ये म्हणाले, “भारतीय जनता पार्टीही आपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी चर्चा आणि विचारविनिमय करते आणि सहजपणे मुख्यमंत्री निवडला जातो. सविस्तर सल्लामसलत करूनही भाजपाचे उमेदवार एकमेकांवर कधीही टीका करत नाहीत. किंवा समर्थकांना एकत्र आणणे आणि प्रसारमाध्यमांद्वारे पक्षाला गुप्त धमक्या देणं, हे भाजपात तुम्हाला कधीही दिसणार नाही.”

“याउलट, काल सायंकाळी डीके शिवकुमार यांनी क्लॅरिजेस येथे पत्रकारांची बैठक आयोजित केली. तिथे उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जवळपास घोषित केलं. काँग्रेसमधील ही स्थिती खेदजनक आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे स्वतः निर्णय घेणारे किंवा निर्णय घेणार्‍या गटाचा एक भागही नाहीत, ते केवळ पोस्टमॅन म्हणून काम करताना दिसतात. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या हायकमांडचा संदर्भ देतात,” असा टोला मालवीय यांनी लगावला.

Story img Loader