BJP Bhajan Lal Sharma Rajasthan New CM : छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाने राजस्थानमध्ये नेतृत्व बदल केला असून भजनलाल शर्मा यांना नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. यामुळे आता वसुंधरा राजे पर्वाचा शेवट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ३ डिसेंबर रोजी राजस्थान आणि इतर तीन राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय होत नव्हता. त्यानंतर पहिल्यांदा छत्तीसगडचा मुख्यमंत्री ठरवला गेला. तेव्हाच भाजपा वर्तमान नेतृत्वात बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे निश्चित झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज दुपारपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरविण्यासाठी मॅरेथॉन बैठक सुरू होती. केंद्रीय निरीक्षक आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांड्या यांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली. दुपारी २ वाजता राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह जयपूर येथे आले. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार समजल्या जाणाऱ्या वसुंधरा राजे यांनी त्यांचे स्वागत केले. “राजस्थानमधील भाजपा आमदारांची आज बैठक घेऊ आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला नवा मुख्यमंत्री मिळेल”, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी दुपारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. त्याआधीच मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा झाली.

कोण आहेत भजनलाल शर्मा?

५६ वर्षीय भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. जयपूरमधील सांगानेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मतांनी पराभव केला. भजनलाल यांना एकूण १ लाख ४५ हजार १६२ एवढी मते मिळाली. ते पहिल्यांदाच आमदार झाले असले तरी त्यांनी पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केले असून ते चार टर्म भाजपाचे प्रदेश सरचिटणीस होते. भजनलाल शर्मा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे. तसेच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काही काळ काम केलेले आहे.

भाजपाच्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीच भजनलाल शर्मा यांच्या नावाच प्रस्ताव ठेवला आणि नंतर पक्षाच्या सर्व आमदारांनी त्याला पाठिंबा दिला.

काल सोमवारी भाजपाने मध्य प्रदेशमध्येही धक्कातंत्राचा अवलंब करत चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांना बाजूला सारत ओबीसी नेते मोहन यादव (५८) यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. तर छत्तीसगडमध्ये रमन सिंह यांच्याऐवजी आदिवासी नेते विष्णू देव साय (५९) यांना मुख्यमंत्रीपदी बसविले. आता राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा या ब्राह्मण समाजातील नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

२५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. राजस्थानमधील निकालात मागच्या ३० वर्षांपासून चालत आलेली परंपरा याहीवेळेस कायम राहिली. विद्यमान काँग्रेस सरकारला सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात अपयश आले. आतापर्यंत एकाही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळविता आलेली नाही. १९९ सदस्यांच्या विधानसभेत भाजपाने ११५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणेच स्पष्ट बहुमत असल्यामुळे राजस्थानमध्येही नवा चेहरा दिला जाईल, असा अंदाज होता. त्याप्रमाणे निर्णय झालेला दिसतो.