अमेरिकेने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यास अपयश आले. मोदी यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी मागे घेणे कसे गरजेचे आहे, हे अमेरिकेतील कॉंग्रेसचे, सिनेटचे सदस्य यांना पटवून देण्यासाठी गेले काही दिवस अमेरिकेत राहून प्रयत्न करणाऱया भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य के. जे. अल्फॉन्स यांना स्पष्ट शब्दांत कोणतेच आश्वासन मिळाले नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अल्फॉन्स या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी मोदी यांना लवकरच राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका मिळणार आहे. त्यामुळेच आताच जर त्यांच्यावर घातलेली बंदी उठविली नाही, तर पुढे खूप उशीर झालेला असेल, या शब्दांत तेथील कॉंग्रेस, सिनेट सदस्यांना, अधिकाऱयांना आणि शिक्षणतज्ज्ञांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणाकडूनच निश्चित असे आश्वासन मिळाले नाही.
लवकरच मोदींबद्दलचे अमेरिकेतील मत बदलेल आणि त्यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी उठविली जाईल, असा विश्वास अल्फॉन्स यांना वाटतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा