ताजमहालमध्ये बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात, अशी मागणी भाजपाच्या एका नेत्याने केली आहे .अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात त्यांनी याबाबत याचिकाही दाखल केली आहे. या बंद खोल्यात हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ताजमहाल्याच्या खोल्यामध्ये हिंदू देवतांच्या मुर्तीं
ताजमहालशी संबंधित वाद खूप जुना आहे. ताजमहालमधील सुमारे 20 खोल्या कुलूपबंद असून सुरक्षतेच्या कारणास्तव कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. काहीजण असा दावा करतात, की या खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या आणि धर्मग्रंथांच्या मूर्ती आहेत. वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी या खोल्या उघडण्यासाठी ASI ला निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका मी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. “या खोल्या उघडण्यात आणि सर्व वाद मिटवण्यात काहीही नुकसान नाही” असे भाजपा नेत्याने म्हणले आहे. तसेच या खोल्यांची तपासणी करण्यासाठी आणि तेथील हिंदू मूर्ती किंवा धर्मग्रंथांशी संबंधित पुरावे शोधण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ताजमहाल हे मूळ शिवमंदिर असल्याचा दावा
२०१५ मध्ये, सहा वकिलांनी ताजमहाल हे मूळचे शिवमंदिर असल्याचा दावा करून खटले दाखल केले होते. २०१७ मध्ये भाजपा नेते विनय कटियार यांनी दाव्याची पुनरावृत्ती केली होती. जगातील सात आश्चर्यापैकी ताजमहाल हे एक आहे. ताजमहालाच्या सुंदरतेची जगभरात ओळख आहे. ताजमहालला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. असे म्हणतात की, ताजमहाल मुघल बादशाह शाहजहानने आपली पत्नी मुमताजची आठवण म्हणून बनवले होते. मात्र, जानेवारी २०१९ मध्ये भाजपा नेते अनंत कुमार हेगडे यांनी असा दावा केला होता, की ताजमहाल शाहजहानने बांधला नसून तो राजा जयसिंहाकडून विकत घेतला होता. फेब्रुवारी २०१८ मध्ये, ASI ने आग्रा कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले, की ताजमहाल खरोखरच मुघल सम्राट शाहजहानने मकबरा म्हणून बांधले होते. तिथे शहाजानला मुमताजचे तीर्थस्थान बनवायचे होते.