राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाने जल्लोष सुरू केला आहे. देशभरात भाजपाचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करताना दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री आणि दिल्लीतील भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी द्रौपदी मुर्मूंच्या विजयानंतर ढोल वाजवत आनंद व्यक्त केला. मात्र, यावेळी एका वाहिनीशी बोलताना, त्यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख पंतप्रधान म्हणून झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. दरम्यान, विजयाचे ट्वीट करताना मात्र त्यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपीत म्हणून बरोबर केल्याचे दिसत आहे. त्यामुळे बोलण्याच्या ओघात ही चूक झाल्याची शक्यता आहे.
हेही वाचा – सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, धमकीच्या पत्रानंतर केली शस्त्रपरवान्याची मागणी
द्रौपदी मुर्मूंचा उल्लेख पंतप्रधान म्हणून
राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापूर्वी मिनाक्षी लेखी एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. यावेळी बोलताना ”द्रौपदी मुर्मू भारताची ‘पंतप्रधान’ म्हणून निवड निश्चित आहे”, असे वक्तव्य त्यांनी केले. हा व्हिडीओ काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे.
हेही वाचा – पाठीत खंजीर कुणी खुपसला? रामदास कदम यांचं आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
सोशल मीडियावर ट्रोल
बोलण्याच्या ओघात झालेल्या या चुकीमुळे नेटकऱ्यांनी मिनाक्षी लेखी यांना ट्रोल केले आहे. सत्तेची ही किती नशा आहे. मोदी सरकारचे मंत्री राष्ट्रपतीना पंतप्रधानांन म्हणू लागले आहेत, असे ट्वीट एका युजरने केले आहे. तर दुसऱ्या एका युजरने ट्वीट करताना म्हटले, ” मीनाक्षी लेखी यांना बोलण्यासोबतच लिहितारही येत नाही. त्यांनी यापूर्वी स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत हे शब्द चुकीचे लिहिले होते.