मोदी सरकारच्या नमामि गंगे योजनेवर भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी वेगळा सूर लावत आताच्या पद्धतीने गंगा येत्या ५० वर्षांतही स्वच्छ करता येणार नाही अशी टीका केली आहे.
गंगा प्रकल्पाबाबत ते म्हणाले की, गंगेत जर पाण्याचा अखंड प्रवाह नसेल तर ती स्वच्छ करणे स्वप्नच ठरेल. लहान तुकडय़ात विभाजन करून नदी स्वच्छ केली जाणार असेल तर ती ५० वर्षांत स्वच्छ तर होणार नाही शिवाय तिचे रूपांतर लहान तळ्यांमध्ये होईल. नदीत मोठय़ा बोटी जाऊ शकणार नसतील तर जहाजे कशी चालवता येतील. गंगा स्वच्छता मोहीम राबवताना आधी गंगेची स्थिती जाणून घ्यायला पाहिजे होती.
गंगा योजनेवर मुरली मनोहर जोशींची टीका
मोदी सरकारच्या नमामि गंगे योजनेवर भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी वेगळा सूर लावत आताच्या पद्धतीने गंगा येत्या ५० वर्षांतही स्वच्छ करता येणार नाही अशी टीका केली आहे.
First published on: 06-06-2015 at 07:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader murli manohar joshi to modis ganga project