भाजपा नेते राम माधव यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि महाआघाडीवर निशाणा साधला आहे. स्टॅलिन यांच्याशिवाय महाआघाडीच्या नेत्याचे नाव निश्चित करण्यासाठी कोणी तयार नाही. पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याकडे ६ लोक रांगेत उभे आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरही भाष्य केले. अध्यादेशाचा मार्ग खुला आहे. पण आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ४ जानेवारी दिली आहे. फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण आणून लवकरच हे संपेल अशी आशा आहे. जर असे झाले नाही तर दुसरा पर्याय शोधावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसबाबत माधव म्हणाले की, राहुल काँग्रेसचे नेते आहेत. हे त्यांनी निश्चित केले पाहिजे की, त्यांचे नेतृत्व पक्षासाठी चांगले आहे की, नाही. आम्ही काँग्रेससाठी त्यांच्या नेतृत्वावर कसे बोलू शकतो. नुकताच झालेल्या निवडणुकीत त्यांनी यश मिळवले, याबाबत काहीच शंका नाही.

विधानसभा निवडणुकीत यश मिळाले म्हणून जर राहुल पंतप्रधानपदासाठी पर्याय असतील तर महाआघाडीची गरजच नाही. आजही स्टॅलिन यांच्याशिवाय महाआघाडीच्या नेत्याचे नाव निश्चित करण्यासाठी कोणीच तयार नाही. पंतप्रधानपदासाठी त्यांच्याकडे ६ लोक रांगेत आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी तिहेरी तलाकबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, याप्रकरणी मोदी सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बहुसंख्य मुसलमानांनी त्याचे स्वागत केले आहे. मुस्लीम महिलांसाठी हे वरदान सिद्ध होईल.

Story img Loader