जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका भाजपा नेत्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहावर रक्ताचे डाग आढळल्याचीही माहिती मिळत आहे. सोम राज असं मृत आढळलेल्या भाजपा नेत्याचं नाव आहे. सोम राज हे मंगळवारी पहाटे आपल्या गावानजीक असणाऱ्या निर्जनस्थळी झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोम राज हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यानंतर मंगळवारी पहाटे ते आपल्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, तपासाला सुरुवात केली आहे. राज यांचा मृतदेह खाली उतरवला असून शवविच्छेदनासाठी चार डॉक्टरांचं पथक तयार करण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा- सोनाली फोगट यांच्या बहिणीने व्यक्त केला हत्येचा संशय; म्हणाल्या, “जेवणात काही तरी…”

कठुआचे एसएसपी आरसी कोतवाल यांनी सांगितलं की, संबंधित घटना कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी डॉक्टरांचे चार सदस्यीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या घटनेच्या पुढील तपासासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader