नेपाळमधील विमान अपघातामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या अपघातात सर्व ६८ प्रवासी तसेच ४ क्रू मेंबर्स यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच एका प्रवाशाने इंडिगो एअरलाईन्स या हवाई वाहतूक कंपनीच्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा अचानकपणे उघडल्याचे समोर आले आहे. ही घटना १० डिसेंबर रोजी घडली होती. विशेष म्हणजे विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडणारी व्यक्ती ही भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >> Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती
तेजस्वी सूर्या यांनी उघडला आपत्कालीन दरवाजा
मिळालेल्या माहितीनुसार विमानोड्डाण होण्याच्या काही क्षणांअगोदर प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र विमानाला उड्डाण घ्यायला साधारण अडीच तासांचा उशीर झाला. साधारण एका महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याच विमानातून तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांच्यासोबत तेजस्वी सूर्या प्रवास करत होते. याच कारणामुळे उड्डाण घेण्याअगोदर विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडणारे प्रवासी हे भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या असल्याचे म्हटले जात आहे. इंडिगो एअरलाईन्सने मात्र आपल्या निवेदनात कोणाचेही नाव घेतेलेले नाही.
हेही वाचा >> Coronavirus : देशात करोनाबाधितांची संख्या १०० पेक्षा खाली, ४ दिवसांपासून एकाचाही मृत्यू नाही
नेमकं काय घडलं?
मागील वर्षाच्या १० डिसेंबर रोजी नियोजित वेळेनुसार सकाळी १०.०५ वाजता विमान उड्डाण घेणार होते. या विमानात तेजस्वी सूर्या आणि अण्णामलाई आपत्कलीन दरवाजाजवळ बसलेले होते. उड्डाणाअगोदर विमानातील कर्मचारी प्रवाशांना सुरक्षाविषयक नियम सांगत होते. याच वेळी सूर्या यांनी आपत्कालीन दरवाजा उघडला होता. एकीकडे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. मात्र त्याच वेळी सूर्या यांनी कथितपणे दरवाजा उघडल्यामुळे काही क्षणांसाठी गोंधळ निर्माण झाला होता. परिणामी उड्डाण साधारण अडीच तासांसाठी लांबले.
हेही वाचा >> Nepal Airplane Crash :”…अन् ते हास्य शेवटचं ठरलं,” अपघातग्रस्त विमानातील हवाईसुंदरीचा व्हिडीओ व्हायरल!
दरम्यान, विमान कंपनीने वरील घटना घडल्याचे मान्य केले आहे. मात्र ही हरकत करणाऱ्या प्रवाशाचे नाव घेतलेले नाही. तसेच ही घटना घडल्यानंतर नियमानुसार संपूर्ण विमानाची पाहणी करण्यात आली. याच कारणामुळे उड्डाणास उशीर झाला. सर्व तपासण्या करूनच उड्डाण घेण्यात आले, असे इंडिगो एअरलाईन्सने सांगितले आहे.