अखिलेश यादव यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या एका अंध व्यक्तीला एका भाजपा नेत्याने काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अंध व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच आपण समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना मत देणार असल्याचे त्याने म्हटले होते. त्यातून हा मारहाणीचा प्रकार घडला असून तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उत्तर प्रदेशातील संभाल येथे ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोहम्मद मिया असे मारहाण करणाऱ्या भाजपा नेत्याचे नाव आहे. एका व्हिडिओमध्ये मिया हे एका अंध व्यक्तच्या चेहऱ्यावर काठीने प्रहार करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडितून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या अंध व्यक्तीने भाजपाविरोधात शेरेबाजी केल्याने त्याला मारहाण करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.

‘वोट देंगे अखिलेश को’ अशी घोषणाबाजी या व्हिडिओमध्ये ती अंध व्यक्ती करीत असल्याचे दिसते. त्यानंतर भाजपा नेता मिया यांनी त्याला असभ्य भाषेत संभावना केली. दरम्यान, आपल्या या कृत्याचे मिया यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, तो अंध व्यक्ती दारु प्यायला होता. त्यामुळे तो वेड्यासाऱखा बडबडत होता, त्याला केवळ तिथून जाण्यास मी सांगत होतो.

या प्रकरणी मिया यांच्याविरोधात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिया यांना ताब्यात घेण्यासाठी आम्ही पोलिसांचे पथक रवाना केल्याचे संभालचे सर्कल ऑफिसर सुदेशकुमार यांनी सांगितले. मार्च २०१८ मध्ये भाजपा सत्तेत येऊन योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन होण्यापूर्वी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सत्तेत होता आणि अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.