भाजपचे ज्येष्ठ नेते राकेश रस्तोगी यांचा मृतदेह शनिवारी उत्तर प्रदेशातील बरेली येथे गाडीत आढळला. शुक्रवारी संध्याकाळपासून रस्तोगी हे बेपत्ता होते.
४० वर्षीय राकेश रस्तोगी यांच्या मृतदेहावर जखमेच्या खुणा आढल्याने त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी रस्तोगी खासगी कामासाठी घराबाहेर पडले. मात्र, त्यादिवशी ते परत न आण्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. अखेर काल त्यांचा मृतदेह एका गाडीत सापडला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या हत्येबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या दहा दिवसांत उत्तर प्रदेशात हत्या झालेला हा तिसरा भाजपचा नेता आहे. यापूर्वी, भाजप नेते विजय पंडित यांचा मृतदेह नोएडा येथील दाद्री भागात सापडला होता तर ओम वीर यांचा मुझफ्फरनगर येथे काही दिवसांपूर्वीच खून करण्यात आला.

Story img Loader