पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाने रविवारी देशभरातील मंदिरे आणि आसपासच्या भागात देशव्यापी स्वच्छता मोहीम सुरू केली. दिल्लीतील रविदास मंदिरात या मोहिमेचा शुभारंभ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आला. नड्डा यांनी येथील करोलबाग येथील गुरु रविदास मंदिरातील स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

भाजपने मकर संक्रांतीपासून अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक होईपर्यंत म्हणजेच २२ जानेवारीपर्यंत देशभरातील मंदिरांची स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील रविदास मंदिरात या मोहिमेचा शुभारंभ नड्डा यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशाच्या विविध भागात स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतला.

हेही वाचा >>>Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची ‘चाय पे चर्चा’, मणिपूरमध्ये साधला स्थानिकांशी संवाद

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या येथे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे गांधीनगर येथील स्वच्छता मोहिमेत सामील झाले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओडिशातील बालेश्वर येथील एका मंदिरात मोहिमेसाठी हजेरी लावली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, भाजपने मकर संक्रांतीपासून देशभरातील अनेक मंदिरे आणि पवित्र संकुलांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे आणि पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यामध्ये योगदान देतील’, असे नड्डा यांनी समाजमाध्यमांवर वर प्रसारीत केले आहे.

Story img Loader