अलिराजपूर : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १५० जागाही मिळणार नाहीत, असा दावा करत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलू इच्छित असलेले संविधान वाचवणे, हेच या निवडणुकीचे उद्दिष्ट असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघातील अलिराजपूर जिल्ह्यातील जोबत शहर येथे प्रचार सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस सरकार नागरिकांच्या हितासाठी आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवेल, असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

की, जातीवर आधारित जनगणना केल्याने लोकांची सद्या:स्थिती समोर येईल आणि देशातील राजकारणाची दिशाही बदलेल. परंतु भाजप नेते स्पष्टपणे म्हणतात की संविधान बदलले जाईल. त्यासाठीच ते ‘अब की बार चारसौ पार’चा नारा देत आहेत. पण हा नारा बाजूला ठेवा, त्यांना यंदाच्या निवडणुकीत १५० जागाही जिंकता येणार नाहीत, असा दावाही राहुल यांनी केला. ही निवडणूक संविधानाचे रक्षण करण्यासाठीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांचे घटनात्मक अधिकार, आदिवासी, दलित आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घ्यायचे आहे, असा दावा राहुल यांनी केला.

हेही वाचा >>> सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यासाठी सज्ज

कोट्यवधी लोकांना लखपतीकरणार

‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय आणि सर्वसामान्य जातीतील गरिबांच्या उत्थानासाठी जात-आधारित जनगणना आणि आर्थिक जनगणना केली जाईल. हे एक क्रांतिकारक पाऊल असेल, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसला देशातील कोट्यवधी जनतेला ‘लखपती’ करायचे आहे. पंतप्रधान मोदी केवळ २२ अब्जाधीशांची काळजी घेतात आणि त्यांचे कर्ज माफ करतात, असा आरोपही केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp led nda will not even get 150 seats in lok sabha polls says rahul gandhi zws