पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ४८ जागांपैकी केवळ ८ जागांवर भाजप समर्थित उमेदवार विजयी झाले. समाजवादी पक्षाने पाठिंबा दिलेल्या २५ उमेदवारांनी या ठिकाणी विजय मिळवला.
मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूर खेडय़ात भाजप समर्थित अरुण सिंग यांना बसपच्या रमेश ऊर्फ गुड्डू तिवारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. इतर दोन विभागांमध्ये मात्र भाजपचे उमेदवार विजयी झाले.
भाजपने पाठिंबा दिलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुजित सिंग यांनी सिवपुरीची जागा जिंकली. भाजपने यावेळी गेल्या वेळेपेक्षा ५ अधिक, म्हणजे ८ जागांवर विजय मिळवल्याचा दावा पक्षाचे काशी क्षेत्र अध्यक्ष लक्ष्मण आचार्य यांनी केला.
बसपची सरशी
उत्तर प्रदेशातील जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये अनेक मंत्र्यांचे नातेवाईक आणि ज्येष्ठ नेते पराभूत झाल्याने सत्ताधारी समाजवादी पक्षाला धक्का बसला आहे, तर बसपने निवडणुकांत चांगली कामगिरी केली आहे. चार टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची सोमवारी मोजणी झाली.

Story img Loader