BJP manifesto Delhi Legislative Assembly election 2025 : केंद्रशासित प्रदेश व देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून सर्वच राजकीय पक्ष व उमेदवारांची दिवसभर लगबग चालू आहे. तर, संपूर्ण देशाचं लक्ष आता या निवडणुकीकडे लागलं आहे. निवडणुकीमुळे लोकांना वेगवेगळी आश्वासनं देणं, मतदारांना आकर्षित करतील अशा योजनांची ‘रेवडी’ उडवण्याचे प्रकार चालू झाले आहेत. सत्ताधारी आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा दिल्लीकरांना विकासाची गॅरंटी दिली आहे. तर, काँग्रेस व भाजपाकडूनही तोच प्रयत्न चालू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली आहेत. अशातच, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा (संकल्प पत्र) प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यातील विविध आश्वासनांद्वारे भाजपाने सायलेंट वोटर मानल्या जाणाऱ्या महिलांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे.

भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज (शुक्रवारी) दुपारी २ वाजता त्यांचा जाहीनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याद्वारे भाजपाने जनतेसाठी सरकारची तिजोरी उघडण्याचं आश्वासन दिलं आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या धर्तीवर भाजपाने महिला समृद्धी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला २,५०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपाने आश्वासन दिलं आहे की, आम्ही सत्तेत आलो तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही योजना जाहीर करू. तसेच एलपीजी सिलेंडरवर गरीब महिलांना ५०० रुपयांचं अनुदान देणार असल्याचं आश्वासनही भाजपाने दिलं आहे. यासह होळी व दिवाळीला एकेक सिलिंडर मोफ्त देण्याचं आश्वासन दिलं आहे.

Gopan Swami Samadhi
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Uday Samant On Thackeray group
Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”
Consumption Of Alcohol By Wife Not Cruelty
‘माझी पत्नी मद्यपान करते’, पतीचा घटस्फोटासाठी अर्ज; न्यायालयाने म्हटले…
Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Maharashtra Live News Updates in Marathi
Saif Ali Khan Health Updates : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; मुंबई पोलिसांची माहिती
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Two brother killed in mob attack
Beed Crime News: बीड जिल्हा पुन्हा हादरला; जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, तिसरा गंभीर जखमी

भाजपाकडून घोषणांचा पाऊस

  1. मध्ये प्रदेशमधील भाजपाचं सरकार महिलांना १२५० रुपये सन्मान निधी म्हणून देत आहे. तर, महाराष्ट्रातील २.४ कोटी महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जात आहे. छत्तीसगडमध्ये दर महिन्याला १,००० रुपये दिले जात आहे. हरियाणातील महिलांना २,१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता भाजपाने दिल्लीतील महिलांना २,५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.
  2. पीएम मातृत्व वंदन योजनेअंतर्गत पहिल्या प्रसुतीनंतर महिलेला ५,००० रुपये व दुसऱ्या प्रसुतीनंतर ६,००० रुपये देण्याचं वचन भाजपाने दिलं आहे.
  3. एलपीजी सिलेंडरवर गरीब महिलांना ५०० रुपयांचं अनुदान दिलं जाईल.
  4. होळी व दिवाळीला एकेक सिलिंडर मोफत दिला जाईल.
  5. मातृ सुरक्षा वंदन योजना अधिक बळकट करण्यासाठी माता व नवजात बाळासाठी सहा पोषण किट्स दिले जातील.
  6. गर्भवती महिलेला २१,००० रुपये दिले जातील.
  7. अटल कँटीन योजनेअंतर्गत ५ रुपयांमध्ये भोजन दिलं जाईल.
  8. यासह भाजपाने दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.

Story img Loader