आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) निवडणुकप्रचार प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची निवड झाल्याच्या महिन्याभरातच भाजपतर्फे निवडणुकप्रचारासाठीच्या योजनांना वेग येण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार भाजपच्या निवडणुकप्रचारासाठी चार नव्या उप-समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या उप-समित्यांच्या मार्फेत समितीप्रमुख नरेंद्र मोदी आगामी निवडणुकांसाठीच्या प्रचार योजना आखणार आहेत. त्याउद्देशाने ४ जुलै रोजी भाजपच्या सचिव आणि समन्वय समितीच्या सभासदांची सभा घेण्यात येणार आहे. यात निवडणुक प्रचार, निवडणुक व्यवस्थापन, निवडणुकीसाठीच्या योजना आणि निवडणुकीचा जाहीरनामा या चार मुख्य मुद्दयांना अनुसरून योजना आखली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
पक्षाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी स्वतंत्र निवडणुक योजना समिती अजून जाहीर केलेली नाही. पक्षाच्या सचिव आणि समन्वय समितीच्या सभासदांच्या मदतीनेच मोदी निवडणुक प्रचाराची योजना आखणार आहेत. यात ते सर्वांना सामावून घेणार आहेत तसेच निवडणुक प्रचाराबद्दलच्या काही नव्या योजनांवर चर्चा करावयाची असल्यामुळे चार जुलै रोजी सभा घेण्यात येणार असल्याचे या सभेला उपस्थित राहणार असणाऱया भाजपच्या नेत्याने दिली आहे. 

Story img Loader