शिलाँग : लोकांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे असा सल्ला मेघालयमधील भाजपचे मंत्री सनबोर शुलाय यांनी दिला आहे. शुलाय हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांचा गेल्याच आठवड्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला होता. ते म्हणाले, की लोकशाही देशात जो जे वाटेल ते खाऊ शकतो. मी तर लोकांनी चिकन, मटन, मासे न खाता गोमांस भक्षण करावे या मताचा आहे. कारण त्यामुळे भाजप गोहत्या बंदी लादणार असल्याचा समज दूर होण्यास मदत होईल.
शुलाय हे पशुसंवर्धन मंत्री असून त्यांनी असे सांगितले, की गोहत्या प्रतिबंधक कायदा शेजारच्या राज्यात लागू करण्यात आला आहे, पण आपण आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलणार असून त्यांना गाई-गुरांची वाहतूक रोखू नये असे सुचवणार आहोत.