लैंगिक शोषणाच्या आरोपावरून गोव्याचे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. दरम्यान नाईक यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. ५८ वर्षीय नाईक हे दक्षिण गोव्यातील मुरगाव मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहेत. यापुर्वी ऊर्जा व गृहनिर्माण ही खाती त्यांनी भूषणवली असून ते तीनदा विधानसभेवर निवडून आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नाईक यांनी एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प अमोणकर यांनीही या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी संबंधित महिला आणि आमदार नाईक यांच्या कथित संभाषणाची ध्वनिफीतही त्यांनी सादर केली. त्यानंतर बुधवारी रात्री नाईक यांनी निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामा दिल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.

नाईक यांनी पदाचा गैरवापर करत महिलेचे शोषण केल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे. चोडणकर यांनी ३० नोव्हेंबरला गोवा मंत्रिमंडळातील एक व्यक्ती अशा प्रकारांमध्ये सामील असल्याचा आरोप केला. संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. संबंधित मंत्र्याला हटविले नाही तर नाव जाहीर करू असा इशारा काँग्रेसने दिला होता. ही मुदत संपल्यावर नाव जाहीर केले. मात्र आता नाईक यांच्या राजीनाम्यामुळे भाजपची नामुष्की झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक फेब्रुवारीत अपेक्षित आहे.   

महिला आमदाराचा राजीनामा

दरम्यान गोव्यातील भाजपच्या आमदार अलिना सालढाणा यांनी आमदारकी व भाजपचा राजीनामा दिला आहे. 