छत्तीसगडमधील एका भाजपा आमदाराने बलात्कार, खून, दरोडा अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अजब मागणी केलीय. सरकारने दारुला पर्याय म्हणून भांग, गांजाच्या व्यसनाला प्रोत्साहन द्यावं, अशी मागणी भाजपा आमदार कृष्णमूर्ती बंधी यांनी केली. यानंतर छत्तीसगडमध्ये जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसने एक लोकप्रतिनिधी व्यसनांना प्रोत्साहन देणारं वक्तव्य कसा करू शकतो, असा सवाल करत टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने निवडणुकीत छत्तीसगडमध्ये दारुबंदी करू असं आश्वासन दिलं होतं. यावर बोलताना कृष्णमूर्ती बंधी म्हणाले, “राज्यात दारुबंदीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपण गांजा आणि भांगचा पुढे जाऊन विचार करायला हवा. जर लोकांना व्यसन करायचं असेल तर त्यांना गांजा, भांगसारखे पर्याय वापरण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे.”

गांजा, भांग या व्यसनांमुळे बलात्कार, खून, दरोडा असे गुन्हे घडत नाहीत, असंही मूर्ती यांनी म्हटलं. दारुऐवजी गांजा आणि भांगचा सल्ला देताना आमदार मूर्ती यांनी हे आपलं व्यक्तिगत मत आहे, असंही नमूद केलं.

हेही वाचा : विश्लेषण: स्मृती इराणींच्या मुलीच्या नावे नेमका काय वाद सुरु आहे? काँग्रेस नेत्यांना नोटिसा का पाठवल्या आहेत?

भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर काँग्रेसची सडकून टीका

भाजपा आमदार मूर्ती यांच्या या मागणीनंतर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आलीय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या वक्तव्याचा विरोध करत कोणत्याही प्रकारचं व्यसन वाईटच असतं, असं मत व्यक्त केलं. तसेच त्यांना गांजा हवा असेल तर त्यांनी आपल्या केंद्रातील मोदी सरकारकडे देशभरात गांजा व भांग कायदेशीर करण्याची मागणी केली पाहिजे, असा टोलाही लगावला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla demand to encourage use of cannabis ganja bhang to prevent crime due to liquor pbs