बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंची आजूनही पूजा केली जात आहे. महत्वाचीबाब म्हणजे मध्यप्रदेश निवडणुकांमध्ये नुकत्याच विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदार उषा ठाकूर यांनी आसाराम बापूंच्या भक्तांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून आसाराम बापूंच्या छायाचित्राची पूजा आणि आरतीही केल्याची माहिती समोर आली आहे.
नव वर्षाच्या स्वागतासाठी आसाराम भक्तांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आसाराम बापूंवर बलात्काराचे आरोप असल्याचे माहिती असूनही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांची पूजा करणे कितपत योग्य असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.
उषा ठाकूर म्हणाल्या की, “आसाराम बापूंवर आरोप असल्याचे मला माहिती आहे. परंतु, ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ते माझे समर्थक आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचे निमंत्रण मला मिळाले होते. दरवर्षी मी या कार्यक्रमात सहभागी होते म्हणून मी काही चूकीचे केले असे मला वाटत नाही.” असे म्हणत कार्यक्रमात आसाराम बापूंची पूजा केल्याचा आरोप उषा ठाकूर यांनी फेटाळून लावला आहे.

Story img Loader