विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपला फटका बसला आहे. भाजपचे विद्यमान आमदार देवेंद्र पटेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सिलवानी मतदारसंघाचे आमदार असलेल्या पटेल यांनी २००८च्या निवडणुकीत भारतीय जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र पक्षाच्या अध्यक्षा उमा भारती यांनी त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन केल्यानंतर पटेल भाजपचे आमदार झाले. मात्र भाजपच्या नेतृत्वाकडून आपल्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून, पक्ष सोडावा यासाठी काहींकडून दबावही आला होता, असे पटेल यांनी सांगितले.

Story img Loader