गोव्याच्या खासगी दौऱ्यावर असतानाही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वतः विधानसभेत जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीचे गोवा विधानसभेचे उपसभापती आणि आमदार मायकल लोबो यांनी स्वागत केले. तसेच राहुल गांधींचा नम्र स्वभाव कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


लोबो माध्यमांशी बोलताना म्हणाले, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री पर्रिकरांची विशेष भेट होती. या भेटीदरम्यान राहुल गांधींचा साधेपणा, माणुसकीचे प्रत्येक भारतीयाला आणि गोवेकरांना कौतुक आहे. ते अत्यंत साधे व्यक्ती असून त्यांच्या सारख्या नेत्याची देशाला आणि गोव्याला गरज आहे.

पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी मंगळवारी सकाळी ट्विट करुन याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते, आज सकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची भेट घेतली. त्यांनी लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा त्यांना दिल्या, ही आमची खासगी भेट होती. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

दरम्यान, या भेटीपूर्वी राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणाची महत्वाची फाईल पर्रिकर यांच्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी गोव्यातील एका मंत्र्याच्या ऑडिओ क्लिपचा दाखला दिला होता. या पार्श्वभूमीवर राहुल आणि पर्रिकर यांच्या भेटीवर विविध चर्चांना उत आला होता.