राजस्थानचे भाजपाचे आमदार प्रताप भील यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भील यांच्याविरोधात १० महिन्यांत दुसऱ्यांदा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भील हे राजस्थानच्या गोगुंडा मतदारसंघातून आमदार आहेत. या दोन्ही घटनांमध्ये आमदार भील यांनी महिलांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन, लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

दुसऱ्यांदा घडलेल्या घटनेत एका महिलेने अंबामाता पोलीस अधीक्षकांकडे जाऊन प्रताप भीलने नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. भीलने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलंय.

यापूर्वी सुखेर येथे १० महिन्यांपूर्वी आमदारावर बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सीआयडी तपास सुरू आहे. याप्रकरणी प्रताप भीलने नोकरीसाठी भेटल्यानंतर तिला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून तो सतत फोन करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये आमदाराने तिच्या घरी जाऊन बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिल्याचेही तिने तक्रारीत सांगितले होते.

Story img Loader