गो मातेच्या रक्षणासाठी आम्ही काहीही करायला तयार असून मरण्याची किंवा मारण्याचीही आमची तयारी आहे, असे सांगत हैदराबादमध्ये कोणीही गोमांस फेस्टिव्हल आयोजित करण्याचा प्रयत्न केल्यास हैदराबादचे दादरी करून टाकू, असा इशारा भाजपचे आमदार टी.राजा सिंह लोध यांनी दिला आहे. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गो हत्या बंदीच्या निषेधार्थ बीफ फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या फेस्टिव्हलला टी.राजा सिंह यांनी विरोध केला आहे. प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार खाण्याचा अधिकार आहे. मात्र, एखाद्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार असतील तर हा फेस्टिव्हल रोखण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे टी.राजा म्हणाले. तसेच बीफ फेस्टिव्हल आयोजित केला गेल्यास हैदराबादमध्येही दादरी प्रकरण घडायला वेळ लागणार नाही, असा इशारा देखील त्यांनी आयोजकांना दिला आहे.
गो मातेच्या आशिर्वादाने मी आमदार झालो असून मी आधी हिंदू आणि नंतर राजकारणी आहे. त्यामुळे गायीचे रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. खुद्द नरेंद्र मोदी देखील मला गो मातेचे रक्षण करण्यापासून रोखू शकणार नाहीत, असेही टी.राजा यांनी स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा