BJP MLA Sarita Bhadauria Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आग्रा-वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. लोकांनी आग्रा-वाराणसी या नव्या वंदे भारत ट्रेनचे इटावा रेल्वेस्थानकात जोरदार स्वागत केले. दरम्यान, या वंदे ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेतेमंडळी इटावा स्थानकावर पोहोचली होती. यावेळी इटावातील भाजपा आमदार सरिता भदौरियादेखील कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांच्याबरोबर एक धक्कादायक घटना घडली. या घटनेतून त्या थोडक्यात बचावल्या. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवत असताना झाली धक्काबुक्की

आमदार सरिता भदौरिया इटावा रेल्वेस्थानकात आग्रा-वाराणसी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे राहून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला जात असताना धक्काबुक्की झाली आणि भदौरिया पाय घसरून थेट रेल्वे रुळांवर जाऊन पडल्या.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Image of BJP MLA T Raja Singh.
T Raja Singh : भाजपा आमदाराने भर कार्यक्रमात फाडला बांगलादेशचा ध्वज, गोव्यात नेमकं काय घडलं?

आमदार सरिता भदौरिया रेल्वे रुळांवर पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी ट्रेन तिथेच उभी होती. मात्र, ट्रेनचा हॉर्न वाजताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या नेते आणि इतर लोकांनी लगेच लोको पायलटला ट्रेन थांबवण्याचा इशारा केला. तो इशारा समजताच चालकाने ट्रेन थांबवली आणि त्यामुळे मोठा अपघात टळला. त्यानंतर उपस्थित नेतेमंडळी आणि लोकांनी मिळून भाजप आमदार भदौरिया यांना रुळांवरून उचलले आणि प्लॅटफॉर्मवर आणले.

आमदार सरिता भदौरिया रेल्वे रुळांवर पडताच भाजपा कार्यकर्त्यांनी सावधगिरी दाखवीत त्यांना वाचवले. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, किरकोळ जखम झाल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल नेण्यात आले.

दरम्यान, इटावा रेल्वेस्थानकात वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी इटावातील आमदार सरिता भदौरिया यांच्यासह समाजवादी पार्टीचे खासदार जितेंद्र दोहरे, माजी भाजपा खासदार रामशंकर कठेरिया, भाजपाच्या राज्यसभा खासदार गीता शाक्य यांच्यासह सपा आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – ट्रेनमध्ये माणुसकी म्हणून इतरांना मदत करताय, मग ‘हा’ Video पाहाच; लोक म्हणाले, “भावा…”

कोण आहेत सरिता भदौरिया?

सरिता भदौरिया इटावामधील भाजपाच्या आमदार आहेत. त्या सलग दुसऱ्यांदा तिथून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. गेल्या २० वर्षांपासून त्या भारतीय जनता पार्टीबरोबर काम करीत आहेत. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. भदौरिया यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा १७,२३४ मतांनी, तर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ४,२७७ मतांनी पराभव केला होता. २०१७ मधील सरिता भदौरिया यांचा विजय हा भाजपासाठी खूप मोठा मानला जात होता. कारण- इटावा हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि तिथे भाजप उमेदवाराने बाजी मारली ही राजकीयदृष्ट्या फार मोठी गोष्ट होती.

Story img Loader