भारतासोबतच आख्खं जग करोनाशी लढा देत असताना जगभरात आलेल्या वेगवेगळ्या लसींमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीदेखील करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्यासोबतच मृतांचा वाढणारा आकडा या बाबी सर्वच सरकारांसाठी चिंतेची बाब ठरल्या आहेत. या भीषण अशा करोनावर गोमूत्र हाच पर्याय ठरू शकतो, असा दावा भाजपा आमदाराकडून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या बैरिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी हा दावा केला असून “फक्त आणि फक्त गोमूत्र प्यायल्यानेच करोनाला हरवता येणं शक्य आहे”, असं ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे बुलंदशहरमधील अजून एक आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी देखील अशाच प्रकारचा दावा केला होता. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरेंद्रसिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी हा दावा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा