Kangana Ranaut on Photos with Chirag Paswan: कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकल्या आहेत. मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून त्यांनी पहिल्यांदाच संसद भवनात प्रवेश केला. यानंतर त्यांच्या संसदेतील पहिल्या भाषणापासून ते शेतकरी आंदोलनाबाबत त्यांनी केलेल्या विधानापर्यंत त्या चर्चेत राहिल्या आहेत. आता संसदेतील त्यांच्या व चिराग पासवान यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा होत असून एका मुलाखतीमध्ये त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

एनडीएतील मित्रपक्ष लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी कधीकाळी चित्रपटातही काम केलं होतं. २०११ मध्ये त्यांनी कंगना रणौत यांच्यासह ‘मिले ना मिले हम’ हा पहिला चित्रपट केला होता. आता संसदीय अधिवेशनाच्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र आल्याच्याही जोरदार चर्चा रंगल्या होत्या. यानंतर एकदा ते संसदेत एकत्रच जाताना दिसले. त्यावेळीही हास्यविनोद करतानाचे त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याबाबत कंगना रणौत यांना आज तकच्या मुलाखतीमध्ये विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी त्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Mukesh first wife Saritha alleged he kicked her when she was pregnant
“गरोदर असताना त्याने पोटावर लाथ मारली”, लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या अभिनेत्याबद्दल पहिल्या पत्नीने केलेले धक्कादायक खुलासे
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
kangana ranaut emergency movie on indira gandhi
Kangana Ranaut Emergency Movie: “…ही इंदिरा गांधींच्या आयुष्यातून मला मिळालेली मोठी शिकवण”, कंगना रणौत यांचं भाष्य; आगामी चित्रपटावर मांडली भूमिका!
What Manoj Jarange Said About Devendra Fadnavis?
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी वाढवलं महायुतीचं टेन्शन! भाजपाला इशारा देत म्हणाले, “नागपूर..”

काय म्हणाल्या कंगणा रणौत?

कंगना रणौत यांना यावेळी “चिराग पासवान यांच्यासोबत तुमचे फोटो एवढे व्हायरल का होत आहेत?” अशी विचारणा केली असता त्यावर त्यांनी “संसद तरी सोडा”, असं म्हटलं. “तुम्ही संसदेला तरी सोडा रे. ते लोकशाहीचं मंदिर आहे. मी तिथे माझ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते. चिरागला तर मी फार पूर्वीपासून ओळखते. तो माझा चांगला मित्र आहे”, असं कंगना रणौत म्हणाल्या.

kangana ranaut bjp mp
कंगना रनौत यांना पक्षानं दिली समज! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“त्या बिचाऱ्यानं मला एक-दोनदा हसवलं तर तुम्ही लोक तर मागेच पडलात. आता तोही रस्ता बदलून निघून जातो. हे काही बरोबर नाही”, अशी टिप्पणीही कंगना रणौत यांनी केली.

Kangana Ranaut BJP: “कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणावर बोलण्याचा अधिकार नाही”, भाजपानं केलं स्पष्ट; ‘ते’ विधान भोवलं!

कंगना रणौत यांच्या वक्तव्यावरून वाद

कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. त्यांनी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केलेलं विधान वादात सापडलं होतं. “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”, असं त्या म्हणाल्या.“शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती”, असंही त्या म्हणाल्या होत्या.

Kangana Ranaut Chirag Paswan: ‘मिले ना मिले हम’ म्हणत लोकसभेत पुन्हा भेटले; खासदार कंगना-चिरागची जोडी आता लोकसभेत

कंगना रणौत यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. “पक्षाच्या धोरणावर बोलण्याचा कंगना रणौत यांना अधिकारही नाही व त्यांना तशी परवानगीही नाही”, असं म्हणत भाजपानं त्यांच्या वक्तव्याशी फारकत घेतली होती.