काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींची तुलना रावणाशी करतानाच त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या मार्गावरून काँग्रेसला धारेवर धरलं आहे. “रामाने उत्तरेपासून दक्षिणेकडे यात्रा केली होती. मात्र, राहुल गांधी दक्षिणेपासून सुरूवात करत उत्तरेकडे निघाले आहेत. म्हणजेच ते रावणाचं काम करत आहे, रामाचं नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि रावणामध्ये बरंच साम्य आहे”, असे बोंडे यांनी म्हटले आहे. ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचं काम राहुल गांधी या यात्रेत करत आहेत, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राम अजून समजलेलाच नाही, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे. नाना पटोले यांनी “राहुल आणि राम या नावांमध्ये ‘रा’ शब्द समान आहे. त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करत आहेत, असं वक्तव्यं केलं होतं. या वक्तव्याचा बोंडे यांनी समाचार घेतला आहे.

राहुल गांधी, दिग्विजय सिंह अजून चालत आहेत का?, लोकांची यात्रेकरूंना कुतुहलाने विचारणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलुरमध्ये या यात्रेचे आगमन होणार आहे. काँग्रेसच्या या यात्रेवरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेत्यांनी महाविकासआघाडीमधील आपले प्रमुख मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील या यात्रेत सहभाग नोंदवण्यासाठी निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणावरुन भाजपाने ट्वीटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे आदेश!.”, असं भाजपाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीट सोबत भाजपाने व्यंगचित्र जोडलं असून, त्यात उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकून मुजरा करताना दिसत आहेत.

‘भारत जोडो’ यात्रेत अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी?

‘भारत जोडो’ यात्रेचा महाराष्ट्रात १६ दिवस मुक्काम

‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा १६ दिवसांचा महाराष्ट्रात मुक्काम राहणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ३८३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. दररोज २५ किलोमीटर गांधी स्वत: या पदयात्रेतून चालणार आहेत. प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यासह दररोज शंभर कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार आहेत. २५ किलोमीटरचा प्रवास ज्या ठिकाणी संपेल त्या ठिकाणी ते मुक्काम करणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp anil bonde said rahul gandhi and ravan has similarities criticized nana patole on ram remark rvs