केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढविला असल्याने आता भाजपने काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आम्हाला मदत करावी, असे देशविरोधी वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले होते त्याबद्दल त्यांच्या निषेधाचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी भाजपच्या सदस्याने केली.
शून्य प्रहराला सदर मुद्दा उपस्थित करताना प्रल्हादसिंह पटेल (भाजप) यांनी कोणाचाही नामोल्लेख केला नाही.

Story img Loader