कर्नाटक चामराजनगरचे भाजपा खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद यांचं रविवारी मध्यरात्री बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वा घेतला. गेल्या चार दिवसांपासून ते आयसीयूमध्ये दाखल होते.

माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद अनेक आजारांनी ग्रस्त होते. २२ एप्रिल रोजी त्यांना बंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मैसुरू येथील जयलक्ष्मीपुरम आवास येथे आणलं जाईल.

Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

कोण आहेत व्ही. श्रीनिवास प्रसाद?

व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी १९७६ मध्ये जनता पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे १९७९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इतकेच नाही तर ते काही काळ जेडीएस, जेडीयू आणि समता पक्षाचे सदस्यही होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला. श्रीनिवास यांनी केंद्र सरकारपासून राज्यापर्यंत अनेक महत्त्वाची पदे दीर्घकाळ भूषवली.

१९९९ ते २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवले. नंतर, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते २०१३ मध्ये आमदार झाले आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री झाले. २०१६ मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभेचा राजीनामा दिला आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ च्या पोटनिवडणुकीत, त्यांनी भाजपच्या तिकिटावर नंजनगुडमधून निवडणूक लढवली होती, परंतु नंतर २०१९ मध्ये पक्षाने श्रीनिवास यांना चामराजनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायला लावली, जिथून ते विजयी झाले. परंतु, त्यांनी नुकतीच राजकारणात संन्यास घेत असल्याची घोषणाही केली होती.

Story img Loader