खरंतर पुरुष प्रधान समाज अशी भारताची ओळख, येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटना म्हणजे सामान्य बाब आहे. मात्र, भारतात केवळ महिलांवरच अत्याचार होतात असं नाहीये तर महिलांकडूनही पुरुषांवर छळ केला जातो हे देखील सत्य आहे. त्यामुळेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरुष आयोगही नेमला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार हरी नारायण राजभर यांनी ही मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलांवर अत्याचार झाला तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देशात अनेक संस्था कार्यरत आहेत, याशिवाय महिलांसाठी राष्ट्रीय आयोगही आहे. मात्र, तसा आयोग पुरुषांसाठी नाही. महिलांकडून होणाऱ्या छळामुळे पुरुषही आत्महत्या करताहेत. पुरुषांवर अनेक खोटे गुन्हे नोंदविले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुषांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुरुष आयोग नेमण्यात यावा अशी मागणी राजभर यांनी केली आहे.

गेल्या महिन्यात संपलेल्या संसदेच्या मान्सुन सत्रामध्येही मी पुरुष आयोगाचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर मला देशभरातून अनेक पुरुषांनी या मुद्द्यासाठी पाठींबा दिला. जवळपास 5 हजारापेक्षा जास्त पुरूषांचे मला देशाच्या विविध भागांतून मेसेज आले, मेसेज करणाऱ्यांपैकी काहीजण तर परदेशातीलही आहेत. त्यांनी मी केलेल्या मागणीचं समर्थन केलं आणि मागणीसाठी जोर धरावा अशी मागणी केली आहे. पुरुष आयोगाची जर स्थापना झाली तर पुरुषांना न्याय मागण्यासाठी व्यासपीठ मिळेल. त्यामुळे पुरुषही आयोगाकडे जाऊन न्याय मागू शकतील असे राजभर म्हणाले.