ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच नुसत्या ट्रेलरमुळे चर्चेत आला आहे. या सिनेमाचे प्रमोशन चक्क भाजपाने केल्याची चर्चाही रंगली आहे. अशात अनुपम खेर यांच्या पत्नी आणि भाजपाच्या खासदार किरण खेर यांचा लोकसभेतला अवतार पाहिलात तर तुम्ही म्हणाल अरे या तर भाजपाच्या अॅक्सिडेंटल खासदार. आता याचं कारण विचाराल तर त्याचं अगदीच उघड आहे. त्यांचा व्हायरल होणारा एक व्हिडिओ. या व्हिडिओत किरण खेर अत्यंत विनोदी आणि चिडवाचिडवीचे हावभाव चेहऱ्यावर आणत त्यांचं ते अभिनय कौशल्य लोकसभेत दाखवत आहेत. या संदर्भातला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी लोकसभेत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गींना आरक्षण देण्यासंबंधीच्या विधेयकावर चर्चा सुरु होती. हा विषय किरण खेर यांना बहुदा क्लिष्ट वाटला असावा त्यामुळे त्यातून थोडं बाहेर येत वाकुल्याच दाखव, डोळेच फिरव, विचित्रपणे हसूनच पाहा असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. आता लोकसभेत जे काही कराल ते सगळं कॅमेरात कैद होतं. मात्र कदाचित याचाही किरण खेर यांना विसर पडला होता. त्यांच्या समोरचे खासदार बोलत होते आणि मागे त्या खुशाल चित्रविचित्र हावभाव चेहऱ्यावर आणत चर्चेशी काही घेणंदेणं नसल्याचंच दाखवून देत होत्या. द क्विंटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

संसदेतल्या खासदारांचे याआधी अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये काही जणांना डुलकी लागलेली दिसून येते. तर काहीजण कागदी विमानं उडवताना कॅमेरात कैद झाले आहेत. मात्र आता किरण खेर यांना चेहऱ्यावर विचित्र हावभावांसहीत पाहणं हे नक्कीच हसू आणणारं आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हीही त्यांना नक्कीच म्हणाल की या तर अॅक्सिडेंल खासदार!