President Draupadi Murmu in Udaipur: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या एका दौऱ्यावर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला खासदाराने तीव्र आक्षेप घेतला आहे. एवढंच नसून आपली नाराजी व्यक्त करताना त्यांनी थेट राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे त्यांच्या पदाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपतींना लेखी पत्रही पाठवलं होतं. या पत्रामध्ये राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबतची त्यांची नाराजी व्यक्त करतानाच त्यामागची कारणंही नमूद केली होती. मात्र, त्यानंतरही राष्ट्रपतींचा दौरा झाल्यामुळे संबधित खासदारांनी प्रशासकीय व राजकीय पातळीवरही आपली नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच राजस्थान दौरा केला. यावेळी आपल्या भेटीमध्ये राष्ट्रपतींनी उदयपूरच्या सिटी पॅलेसला भेट दिली. ३ ऑक्टोर रोजी राष्ट्रपतींनी उदयपूरच्या मोहनलाल सुखदेव विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि उपमुख्यमंत्री प्रेम चंद बैरवा यांच्यासह सिटी पॅलेसला भेट दिली. लक्ष्यराज सिंह मेवाड व त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

पण यावरच भाजपाच्या राजसामंद मतदारसंघाच्या महिला खासदार महिमा कुमारी मेवाड व त्यांचे पती आणि नाथद्वारा विधानसभेचे आमदार विश्वराज सिंह मेवाड यांनी आक्षेप घेतला आहे. त्याशिवाय, विश्वराज सिंह मेवाड यांचे वडील महेंद्र सिंह मेवाड यांची राष्ट्रपतींनी भेट घेतली नाही, असाही आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. राष्ट्रपतींचं स्वागत करणारे लक्ष्यराज सिंह यांचे वडील अरविंद मेवाड यांचे महेंद्र सिंह मेवाड हे वडील आहेत. हे सर्वजण महाराणा प्रताप यांचे वंशज आहेत.

महिमा कुमारी मेवाड यांचं नेमकं म्हणणं काय?

सिटी पॅलेस या मालमत्तेवरून कायदेशीर वाद चालू असून अशा ठिकाणी राष्ट्रपतींनी भेट देणं अयोग्य होतं, असा मुख्य आक्षेप महिमा कुमारी व त्यांचे पती विश्वराज यांनी नोंदवला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत समजताच त्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवलं होतं. “आम्ही पत्रात म्हटलं होतं की सिटी पॅलेस ही आमची कौटुंबिक मालमत्ता आहे आणि न्यायालयाकडून त्यासंदर्भातल्या व्यवहारांवर स्थगिती आणण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त संबंधित मालमत्तेबाबत न्यायालय अवमान याचिकाही प्रलंबित आहे. अशा मालमत्तेला भेट दिल्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या प्रतिमेला गंभीर स्वरूपाचा धक्का बसला आहे. शिवाय त्यांनी आमच्या कुटुंबप्रमुखांची (महेंद्र सिंह मेवाड) भेटही घेतली नाही”, असं विश्वराज सिंह मेवाड यांनी नमूद केलं.

“गाय आमची माता, तिला जनावरांच्या यादीतून वगळा”, अविमुक्तेश्वरानंदांची मोदी सरकारकडे मागणी

दौरा रद्द करण्याचीही केली होती विनंती!

दरम्यान, या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर पत्रात दौरा रद्द करण्याची विनंतीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रपती वैयक्तिक भेटीवर असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. “सामान्य व्यक्तीसाठी वैयक्तिक भेट वगैरे ठीक आहे. पण त्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. त्यांच्या पदाला एक सन्मान आहे. त्यामुळे अशा ठिकाणी भेट देणं त्या पदासाठी योग्य नाही”, असं महिमा कुमारी यांनी नमूद केलं.

Story img Loader