झारखंड आणि पश्चिम बंगालमधील काही भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अन्यथा येथील हिंदू समाज संपुष्टात येईल, अशी विधान भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलं आहे. गुरुवारी लोकसभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले निशिकांत दुबे?

पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, तसेच बिहारमधील अरैना, किशनगंज, कठियार या भागात बांगलादेशमधून आलेल्या मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथील हिंदू समाज धोक्यात आला आहे. मात्र, पश्चिम बंगाल आणि झारखंड सरकारचं याकडे लक्ष नाही. त्यामुळे या भाग केंद्रशासित प्रदेशमधून घोषित करावा, अन्यथा येथील हिंदू समाज संपुष्टात येईल, असं निशिकांत दुबे म्हणाले.

हेही वाचा – Kangana Ranaut First Loksabha Speech: अभिनेत्री कंगना रणौतचं लोकसभेत पहिलं भाषण; कोणते मुद्दे मांडले? पाहा Video!

झारखंडमधील आदिवासींच्या संख्येत घट

यावेळी बोलताना त्यांनी या झारखंडमधील आदिवासी समाजाची लोकसंख्येत घट झाल्याचाही दावा केला. झारखंडमधील आदिवासी समुदायाची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. एका रिपोर्टनुसार, मागील काही महिन्यात येथील आदिवासींची लोकसंख्या १० टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, आदिवसींच्या संरक्षणासाठी राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या युतीसरकारने कोणीतीही पावलं उचलली नाहीत, हे दुर्दैवी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – America Travel Advisory : भारतात येणाऱ्या नागरिकांना अमेरिकेनं दिला सतर्कतेचा इशारा; म्हणे, “पूर्व भारतात जाण्यापूर्वी विचार करा”

बांगलादेशातून आलेले मुस्लीम आदिवासी महिलांशी लग्न करतात

पुढे बोलताना, बांगलादेशातून आलेले मुस्लीम येथील झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये स्थायिक होण्यासाठी आदिवासी महिलांशी लग्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. बांगलादेशमधून आलेले मुस्लीम या दोन्ही राज्यातील आदिवासी महिलांनी लग्न करून स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक विशेषत राजकीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या महिलांना लक्ष्य करत आहेत. या दोन्ही राज्यातील एकूण १०० पेक्षा जास्त गावांच्या महिला सरपंचांचे पती हे मुस्लीम आहेत, असं त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे आपण केलेला दावा कोणी खोटा ठरवल्यास मी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देईन, असंही ते ते म्हणाले.

हेही वाचा – Khalistani Pannun : “भारतात परत जा”, कॅनडातील हिंदू खासदाराला खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी

दरम्यान, निशिकांत दुबे यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp nishikant dubey demands new union territory from jharkhand west bengal said hindu will disappear spb